डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 8, 2025 6:57 PM | Maharashtra

printer

राज्याचं आर्थिक आरोग्य उत्तम असून वित्तीय तूटही कमी असल्याचा वित्त आयोगाचा निर्वाळा

महाराष्ट्र राज्याचं आर्थिक आरोग्य अतिशय उत्तम असून त्याची वित्तीय तूटही कमी असल्याची माहिती १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी वार्ताहर परिषदेत दिली. पनगढिया यांनी आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी राज्याने केली असून या क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचं विशेष वाटप करण्याची विनंतीही राज्य सरकारने आयोगाकडे केल्याचं पनगढिया यांनी यावेळी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.