महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथील गंगेतील पाणी स्नानासाठी योग्य असल्याचं सरकारनं पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचा हवाला देत लोकसभेत सांगितलं.
महाकुंभमेळ्यादरम्यान सर्व देखरेख केलेल्या ठिकाणांवरील पाण्याची गुणवत्ता आंघोळीसाठी योग्य होती, असं त्यांनी नमूद केलं. सरकारनं 2022 ते 2025 दरम्यान, नदी स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला एकूण सात हजार 421 कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला होता, असंही त्यांनी सांगितलं.