योजना आखताना ग्रामीण भारताचा विकास नजरेसमोर ठेवायला हवा, त्यामुळे देशांतर्गत स्थलांतरं रोखता येतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भरलेल्या किसान कुंभ कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी योजनांमुळे शेतकरी तसंच समाजातल्या कमकुवत वर्गाला फायदा व्हायला हवा ,यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामधलं त्यांचं योगदान वाढेल आणि शहराकडे स्थलांतर होण्याला आळा बसेल असं ते म्हणाले.
Site Admin | April 9, 2025 8:02 PM | Agri Conclave | Kisan Kumbh
योजना आखताना ग्रामीण भारताचा विकास नजरेसमोर ठेवायला हवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
