डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 12, 2025 1:13 PM | Cricket | IPL

printer

IPL:- क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार असून संध्याकाळी सनराइजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ  आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. 

 

दरम्यान, काल संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट  राईडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकात्यानं चेन्नईला सहज नमवत  विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत केवळ १०३ धावांचा पल्ला गाठता आला. प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट  राईडर्सनं अवघ्या १०  षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या सहज पार केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.