डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत जमीन सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार

अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत जमीन सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालायचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधी मंडळ यात भाग घेणार असून जमान मालकी हक्क योजनेविषयी सादरीकरण करणार आहे.

 

‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबाबत जागृतीकडून कृतीकडे’ ही यावर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी सरकारनं ही योजना राबवली.

 

यामध्ये ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील मालकी हक्काच्या शेतजमीन आणि इतर जमिनीची मोजणी करण्यात आली आणि देशातल्या 1 लाख 60 हजार गावांमध्ये सुमारे 2 कोटी 44 लाखांपेक्षा जास्त मालकीहक्क जमिनीची कार्ड वितरित करण्यात आली आहेत.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा