व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीत अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याचा अंदाज

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीत दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याचा अंदाज आहे, असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी दिल्लीत आयोजित दूरस्थ पत्रकार परिषदेत सांगितलं. एस -४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली आणि एस यू -५७ हे लढाऊ विमान हे पुतिन यांच्या दौऱ्यात चर्चेचे मुख्य मुद्दे असतील, असं ते म्हणाले. भारतातून आयात वाढवण्याच्या शक्यतांवर रशियाचे अध्यक्ष विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ६३ अब्ज डॉलर्स असलेला दोन्ही देशातला व्यापार २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्स होईल, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेनं भारतावर लादलेलं आयात शुल्क हे दबाव टाकण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं.