जागतिक होमिओपॅथी दिन आज साजरा केला जात आहे. होमिओपॅथी ही आरोग्य सेवेसाठी समग्र दृष्टिकोन ठेवणारी जगातील दुसरी – सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली असून, त्यातील नैसर्गिक पद्धतींमुळे लोक हे उपचार पसंत करतात.
आयुष मंत्रालयाच्या मते, देशात १० कोटींहून अधिक लोक आरोग्याच्या गरजांसाठी होमिओपॅथीवर विश्वास ठेवतात. सध्या, देशात तीन लाख ४५ हजार नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर, २७७ रुग्णालयं, आठ हजारांहून अधिक दवाखाने आणि २७७ शैक्षणिक संस्था आहेत.