पुरुष हॉकी आशिया करंडक 2025 ला आजपासून बिहारमध्ये सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय तसंच आशियातील सर्व संघांच्या खेळाडूना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि आशियातील लाखो लोकांच्या हृदयात हॉकी या खेळला एक विशेष स्थान आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
या स्पर्धेत रोमांचक सामन्यांच्या माध्यमातून असाधारण प्रतिभेचं प्रदर्शन घडेल असा पंतप्रधानांनी व्यक्त केला. अलिकडच्या काळात, बिहारनं खेलो इंडिया युथ गेम्स, आशिया रग्बी अंडर 20 सेव्हन्स चॅम्पियनशिप आणि महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून एक उत्साही क्रीडा केंद्र म्हणून आपली छाप पाडली आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.