डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 26, 2025 1:45 PM | G Kishan Reddy

printer

देशातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पोलाद क्षेत्राची ऐतिहासिक कामगिरी

देशातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पोलाद क्षेत्रानं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे, असं केंद्रीय कोळसा आणि खाण  मंत्री जी  किशन रेड्डी यांनी सांगितलं.

 

ते आज मुंबईत  इंडिया स्टील २०२५ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पोलाद क्षेत्राबरोबरच  कोळसा क्षेत्राची वाढ झाली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

 

पोलाद क्षेत्रात किफायतशीर आणि शाश्वततेच्या दृष्टीनं मजबूत अशा कच्च्या मालासाठी रणनीती आखण्याची गरज आहे, असं केंद्रीय मंत्री भूपती राजू यांनी सांगितलं. भू राजकीय भागीदारीवर काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा