देशाची चालू आर्थिक वर्षातली वस्तू आणि सेवा क्षेत्रातली निर्यात ८२० अब्ज डॉलरवर गेली आहे. ही निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या ७७८ अब्ज डॉलरपेक्षा ६ टक्के अधिक असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं सांगितलं.
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योजकाच्या बैठकीत ही आकडेवारी समोर आली आहे.