भारतीय नौदलाच्या इतिहासात आजचा दिवस संस्मरणीय असून भारताची तंत्रज्ञान क्षमता आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने अढळ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी म्हटलं आहे. ते आज गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीच्या ‘तवस्या’ या दुसऱ्या युद्धनौकेचं जलावतरण केल्यानंतर बोलत होते. ही लढाऊ नौका आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. युद्धनौकांच्या निर्यातीत जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्याची भारताची महत्वाकांक्षा यातून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं सेठ यांनी म्हटलं आहे.
Site Admin | March 22, 2025 6:55 PM
गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीच्या ‘तवस्या’ या दुसऱ्या युद्धनौकेचं जलावतरण
