जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही भारताने दिली आहे. प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी जिनिवा इथं ‘आपत्ती जोखीम कमी करणे’ या विषयावरच्या आठव्या परिषदेत ही भूमिका मांडली. मिश्रा यांनी नॉर्वेच्या आंतरराष्ट्रीय विकास उपमंत्र्यांशी चर्चा केली आणि आपत्तीकाळातील जोखीमभार कमी करण्याच्या कामी आंतरराष्ट्रीय सहकार्याचं महत्व अधोरेखीत केलं अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयाने दिली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रालाही मिश्रा उपस्थित राहिले. लवचिक आणि सुरक्षित भविष्यासाठी भागीदारी दृढ करणे असा भारताचा दृष्टीकोन असल्याचं त्यानी यावेळी स्पष्ट केलं.
Site Admin | June 4, 2025 1:30 PM
आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी भारत वचनबद्ध
