गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा राज्यपरिवहन महामंडळ पाच हजार जादा गाड्या सोडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. गणपती उत्सवाच्या अनुषंगाने मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते.
२३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतल्या प्रमुख बसस्थानकातून ही सुविधा उपलब्ध राहील. या गाड्यांचं आरक्षण npublic.msrtcors.com या संकेतस्थळावर तसंच MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.
२२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात होईल.