परराष्ट्र धोरणाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती

भारत-पाकिस्तान दरम्यान सध्याच्या परराष्ट्र धोरणाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. संसदीय समितीसमवेत झालेल्या बैठकीनंतर थरुर यांनी यासंबंधीची माहिती वार्ताहर परिषदेत दिली. परराष्ट्र धोरण विकासाविषयी संसदीय स्थायी समितीला वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं माहिती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचंही थरुर यांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.