युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज सकाळी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमातील विशेष भाग सायकलिंग विथ टीचर्समध्ये सहभागी झाले होते. लठ्ठपणा कमी करून शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यामधील शिक्षकांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.
शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर खूप प्रभाव असतो, त्यामुळे शिक्षकांनी सायकलिंगला सुरुवात करून विद्यार्थ्यांसमोर उदाहरण प्रस्तुत करण्याचं आवाहन मांडवीय यांनी केलं . या अभियानाची सुरुवात गेल्या वर्षी डिसेम्बरमध्ये झाली होती आणि आतापर्यंत देशभरातल्या ५ हजार हुन जास्त ठिकाणी अडीच लाख नागरिक सहभागी झाले आहेत.