देशात गेल्या आर्थिक वर्षात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती १४ टक्के अधिक आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, यापैकी १९ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. तर संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर क्षेत्राला १६ टक्के आणि व्यापार क्षेत्राला ८ टक्के लाभ झाला असल्याचं नमूद केलं आहे. सरकारनं परकीय गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरण लागू केलं आहे, याअंतर्गत बहुतांश क्षेत्रं १०० टक्के एफडीआयसाठी खुली आहेत.
Site Admin | May 28, 2025 9:35 AM | FDI
देशात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक
