डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जगभरातील अनेक देशांमध्येही दिवाळीचा सण उत्साहात साजरा

जगभरात अनेक देशांमधे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. अमेरिका, इंग्लंडसह संयुक्त अरब अमिरातीमध्येही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून या भारतीय उत्सवाने देशभरातल्या सर्व समुदायांना सामावून घेतल्याचं चित्र दिसत आहे.

 

स्थानिकरित्या ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर-दुबईमध्ये दिवाळीचा उत्साह दिसत आहे. पारंपरिक वस्तूंच्या खरेदी बरोबरच सोन्याच्या बाजारातही लक्षणीय गर्दी दिसून आली. अबू धाबी इथल्या मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली असून दिवाळीनिमित्त संपूर्ण अमिरातीमध्ये सामुदायिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेवाभावी उपक्रम होत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.