भारताच्या सागरी हद्दीत व्यापारासाठी प्रवास करणाऱ्या जहाजांच्या नियमनाकरता मांडण्यात आलेलं तटवर्ती नौकानयन विधेयक २०२४ आज लोकसभेत मंजूर झालं. सागरी व्यापारात देशांतर्गत सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं विविध नियमांचं एकत्रीकरण या विधेयकात केलं आहे. हे विधेयक संघराज्य सहकार्याच्या संकल्पनेवर आधारित असून कोणत्याही राज्याच्या अधिकारक्षेत्रावर त्यामुळे गदा येणार नाही असं केंद्रीय बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
Site Admin | April 3, 2025 7:27 PM | Coastal Shipping Bill 2024
लोकसभेत नौकानयन विधेयक २०२४ मंजूर
