महिलांनी पुढाकार घेतला तर एखादी सहकारी बँक यशाच्या शिखरावर पोहचते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. महिलांना अर्थकारण चांगलं कळतं असं ते म्हणाले.न्मित्र महिला नागरी सहकारी बँक ही याचं मूर्तीमंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक उईकेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या बँकेनं गेल्या २५ वर्षात ३०० कोटी भाग भांडवल उभं करतानाच पाच दशांश NPA ठेवला आहे ही अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले.