स्थानिक पातळीसह प्रशासनाच्या सर्व स्तरांवर हवामानाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला पाहिजे असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं ‘भारत २०४७: हवामान- प्रतिरोधक भविष्याची उभारणी’ या परिसंवादाच्या समारोप सत्रात बोलत होते. उष्णतेची लाट आणि पाणी टंचाईचा कृषी क्षेत्रावर होणारा दुष्परिणाम, अशा महत्त्वाच्या विषयांवर बहुआयामी कृती करण्यावर त्यांनी भर दिला. शाश्वत कार्यवाही, सहयोग आणि धोरणाभिमुख हवामान अनुकूलता या विषयांवरही या चार दिवसांच्या परिसंवादात मार्गदर्शन करण्यात आलं.