कर्नाटकमध्ये बंगळुरूत चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर गेली आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विजय साजरा करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात हजारो क्रिकेटप्रेमींनी विविध प्रवेशद्वारांमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये भरपाईची घोषणा केली आहे.