बेंगळुरूमधे चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या विपणन विभागाचा प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह आणखी दोघांना अटक केली. त्यात डीएनए एंटरनेटमेंटचा सुनिल मॅथ्यू आणि किरण कुमार यांचा समावेश आहे. याप्रकरणी कर्नाटक राज्यशासनानं बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांचा चौकशी आयोग नेमला आहे. आयोग येत्या तीस दिवसात अहवाल सादर करेल.
Site Admin | June 6, 2025 4:52 PM | Chinnaswamy Stadium Incident
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विपणन विभागाचा प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह आणखी दोघांना अटक
