March 2, 2025 8:36 PM | Chile Open 2025

printer

Chile Open 2025: भारतीय टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलिपल्लीला विजेतेपद

भारतीय टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलिपल्ली यानं आपला कोलंबियन साथीदार निकोलस बॅरिएंटोस याच्या सोबतीनं चिली खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे. या जोडीनं प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाच्या जोडीचा ६-३, ६-२ असा पराभव केला. ऋत्विक चौधरी आणि निकोलस यांचं दुहेरीतलं पहिलंच विजेतेपद आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.