महाकुंभ मेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच इतर ठिकाणांहून या  विशेष गाड्या सुटतील. या गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून प्रवासी आरक्षण प्रणाली तसंच www.irctc.co.in या रेल्वेच्या संकेतस्थळावरुन आरक्षण करता येईल. या विशेष गाड्यांमध्ये दुसऱ्या वर्गाचे डबे हे अनारक्षित असतील आणि त्यासाठी रेल्वेच्या युटीएस प वरुन तिकीट काढता येईल. याबद्दलची सविस्तर माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मिळेल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.