भारतीय जनता पार्टी आज आपला ४५वा स्थापना दिन साजरा करत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतानाच देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत, विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याचं आवाहन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनीही पक्ष स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरातील टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाच्या भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी १९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा पट उपस्थितांसमोर मांडला. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, गेली २५ वर्षं या महानगर कार्यालयासाठी नागपूर भाजपच्या कार्यकत्यांनी खूप प्रयत्न केले. याप्रसंगी गडकरी यांनी १९८०मध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा पट उपस्थितांसमोर मांडला.