डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अशूरा-ए-मुहर्रम देशाच्या विविध भागात पाळला जात आहे

अशूरा-ए-मुहर्रम आज देशाच्या विविध भागात पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबाला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने या बलिदानाचं स्मरण करून, यातून लोकांना बिकट परिस्थितीत सत्याच्या बाजूने उभं राहण्याची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा