डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि अंगोला या देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात करार

अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लोरेंजो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर आज दोन्ही देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक करार करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार सचिव दम्मू  रवी यांनी नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

 

प्रधानमंत्री मोदी यांनी भारताकडून अंगोलाला भारतीय चलनात २० कोटी डॉलर्सची पत देऊ केली असून त्यानुसार अंगोला भारताकडून संरक्षण उपकरणांची खरेदी करणार आहे. यासाठी अंगोलाने भारतातल्या कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे, असं ते म्हणाले. 

 

अंगोलाचे अध्यक्ष लॉरेंजो काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहुण्यांच्या सन्मानार्थ आज राष्ट्रपती भवनात मेजवानी आयोजित केली आहे. 

 

अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष ३८ वर्षांनंतर भारत भेटीवर आले आहेत. भारत आणि अंगोला यावर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ४० वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. राष्ट्राध्यक्ष लॉरेंजो उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका व्यवसायिक कार्यक्रमात सहभागी होतील. भारत आणि अंगोला दरम्यानचा व्यापार सातत्याने वाढत असून २०२३-२४ दरम्यान ४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देश सोबत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा