डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 26, 2025 8:19 PM

printer

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पातून प्रत्येक गावात पाणी पोहोचेल-गृहमंत्री

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात नांदेड इथं हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरण कामाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते आज झालं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन तसंच कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. राष्ट्रीय कर्करोग संस्था ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या नागपूर परिसराची पायाभरणीही शाह यांनी केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा