छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात १६ माओवाद्यांनी आज पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांपुढं आत्मसमर्पण केलं. यापैकी ६ जणांवर २५ लाख रुपयांचं ईनाम जाहीर केलं होतं. या माओवाद्यांवर विविध नक्षली कारवायांमधे सामील असल्याचा आरोप आहे. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना, छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार प्रत्येकी ५० हजार रुपये तसंच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
Site Admin | June 2, 2025 8:11 PM
छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात १६ माओवाद्यांचं पोलीसांपुढं आत्मसमर्पण
