सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण ही तत्व अंगीकारून, केंद्र सरकारने गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे.
भारताने स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, हवामान बदलावरच्या कृतीमध्ये जागतिक नेता म्हणूनही उदयाला आला आहे. ‘अक्षय ऊर्जा आकर्षण’ देशांच्या यादीत भारतानं ७ स्थान मिळवलं असून, जागतिक स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातला देशाचा वाढता प्रभाव यामधून स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, विस्तारित जैवऊर्जा कार्यक्रम आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वाढता कल, यासारखे उपक्रम शून्य-कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेचा पाया रचत आहेत. स्वच्छ ऊर्जेचा हा प्रयत्न भारताच्या जागतिक हवामान बदलावरच्या नेतृत्वाशी जोडला गेला आहे.
त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय हवामान बदल सहकार्याला आकार देण्यात भारतानं सक्रिय भूमिका बजावली आहे. भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गटाचा संस्थापक सदस्य आहे. हे व्यासपीठ विशेषतः ग्लोबल साऊथ मध्ये स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता आणि आपत्ती हाताळणीमधल्या लवचिकतेला प्रोत्साहन देतं.