डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावर रालोआ सरकारचं लक्ष केंद्रीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महिलांनी गेल्या ११ वर्षांत विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स, सशस्त्र दलं यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

सेवा, सुशासन आणि गरीबांचं कल्याण या तत्वांनी प्रेरित झालेल्या भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. या अकरा वर्षांच्या काळात महिलांच्या विकासावरही भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सुरू केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात याचा उल्लेख केला आहे. विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या ११ वर्षांत नारी शक्तीवर रालोआ सरकारने विशेष लक्ष दिलं आहे. महिलांनी गेल्या ११ वर्षांत विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स, सशस्त्र दलं यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

उत्तम पोषण मिळण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मिशन पोषण २.० या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुली तसंच मातांच्या पोषणावर भर दिला जात आहे. पोषणासह दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी दोन लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. आरोग्याच्या आघाडीवर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना यांमुळे ग्रामीण आणि वंचित भागात सुरक्षित प्रसूती तसंच प्रसूतीसंबंधित आरोग्यासाठी सेवा उपलब्ध झाली आहे. स्वच्छ भारत अभियानांर्गत १२ कोटींहून अधिक शौचालयं बांधण्यात आली असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ झाली आहे.

 

उज्ज्वला योजनेमुळे १० कोटींहून अधिक एलपीजी गॅसजोडण्या दिल्या गेल्या असून त्यामुळे अनेक स्वयंपाकघरं धूरमुक्त झाली आहेत. जलजीवन अभियानामुळे १५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचलं असून त्यामुळे महिलांना होणारा पाण्याच्या शोधाचा त्रास कमी झाला आहे. सुकन्या समृद्धी योजनेत ४ कोटी २० लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली असून त्यामुळे मुलींसाठी आर्थिक सुरक्षितता निश्चित केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा