फ़्रेंच प्रमुख विमाननिर्मिती कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारताची टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड यांनी राफेल लढाऊ विमानाचा सांगाडा भारतात उत्पादित करण्यासाठी चार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राफेल लढाऊ विमानाच्या या महत्वाच्या भागाची निर्मिती पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर होणार आहे.
यामुळे, भारताची विमाननिर्मिती क्षमता आणि जागतिक पुरवठा साखळीतला भारताचा सहभाग आणखी मजबूत होणार आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांनी नुकतंच एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स हैदराबादमध्ये याच्या निर्मितीला सुरुवात करणार असून याचा पहिला टप्पा २०२८ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याची माहिती या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.