पुढल्या अठ्ठेचाळीस तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.