बेंगळुरु मधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंगराचेंगरी झाली.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. कर्नाटक सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव विधान सौधा ते चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमपर्यंतची विजयी मिरवणूक यापूर्वीच रद्द केली होती. पोलीस काल रात्रीपासून उत्सव साजरा करणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत.