डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 23, 2025 2:36 PM

printer

गुप्तचर संस्था शिन बितच्या प्रमुखपदी मेजर जनरल डेविड जिनी यांची नियुक्ती

इस्राईलच्या देशांतर्गत गुप्तचर संस्था शिन बितच्या प्रमुखपदी प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी मेजर जनरल डेविड जिनी यांची नियुक्ती केली. रॉनेन बार यांच्या जागी जिनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासनं केलेले हल्ले रोखण्यात गुप्तचर यंत्रणेला आलेल्या अपयशानंतर त्यांच्यावर कडाडून टीका झाल्यानंतर ही कारवाई केली आहे. इस्राईलच्या लष्करात डेविड जिनी यांनी विविध पदांवर काम केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा