कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरात काल किरकोळ वादाचं रुपांतर दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीत झालं. या घटनेत एका पोलीस उपनिरीक्षकासह आठजण जखमी झाले असून सहा वाहनांचं मोठं नुकसान झालं.
इथल्या उद्यानासमोर लावलेले फलक आणि ध्वनिक्षेपक एका गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उतरवल्यानंतर दुसऱ्या गटातल्या लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली. दुसऱ्या गटानेही दगडफेक केली. सुमारे तासभर हा प्रकार सुरू झाला. त्यातच एका गटाने परिसरातल्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करायला सुरुवात केली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून दोन्ही गटांना शांत केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.